कोरोना तपासणी मोहिमेत आढळले १३ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:33+5:302021-04-08T04:22:33+5:30
ग्रामपंचायत अकलूज व माळीनगर प्राथमिक आरोग्य केद्रातर्फे जुने बसस्थानक, नवीन बाजारतळ, विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल व गणेशनगर येथे कोरोना ...
ग्रामपंचायत अकलूज व माळीनगर प्राथमिक आरोग्य केद्रातर्फे जुने बसस्थानक, नवीन बाजारतळ, विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल व गणेशनगर येथे कोरोना तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक, किराणा व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. रॅपीड ॲन्टीजेन २२१ तर आरटीपीसीआर १०५ अशी ३२६ जणांची टेस्ट घेण्यात आली. त्यामधे १३ जण कोरोनाबाधित सापडले. त्यातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात, दोघांना कोविड सेंटरमध्ये तर उर्वरीत नऊजणांना घरीच विलगीकरण करुन ठेवले आहे.
या मोहिमेस झेडपी सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते यांनी भेट दिली. डाॅ. संकल्प जाधव, दादासाहेब फुंदे, अर्जुन रुपनवर, खाजगी प्रयोग शाळेचे तज्ञ संजय इंगळे व त्यांचे सहकारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, झेडपी शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका व आरोग्य सहायक यांचे सहकार्य लाभले.