करमाळ्यात सात जणांना कोरोना; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:41 AM2021-03-04T04:41:01+5:302021-03-04T04:41:01+5:30
करमाळा शहरात झपाट्याने कोरोना वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना संपत चालला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे ...
करमाळा शहरात झपाट्याने कोरोना वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना संपत चालला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मंगळवारी तपासणी करून घेणाऱ्या २० जणांपैकी ७ जण बाधित आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल डुकरे म्हणाले की, करमाळा शहर व तालुक्यातील जनता पाहिजे तेवढी काळजी घेत नाहीत. मंगळवारच्या अहवालामुळे आम्हीही चिंतीत आहोत. आता जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी जेऊर व कोर्टी या दोन ठिकाणी केंद्रे उभारली असून, करमाळा कुटीर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे या ठिकाणी अजून सुरुवात केली नाही.
---