मंगळवेढा शहर, ग्रामीणमध्ये होतोय कोरोनाचा झपाट्याने प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:09+5:302021-04-24T04:22:09+5:30
मंगळवेढा शहरातील दामाजी चौक, चोखामेळा चौक, बोराळे नाका, साठेनगर, आठवडा बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, धर्मगाव रोड, जुना ढवळस ...
मंगळवेढा शहरातील दामाजी चौक, चोखामेळा चौक, बोराळे नाका, साठेनगर, आठवडा बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, धर्मगाव रोड, जुना ढवळस रोड, मित्रनगर, प्रांत कार्यालय, किल्ला भाग या रस्त्यावरून कामाशिवाय मोकाट हिंडणाऱ्या नागरिकांची वर्दळ वाढली आहे. परंतु या नागरिकांना कशाचीच भीती नसल्यामुळे अनेक तरुण विनामास्क, दुचाकीवर तिघे, चौघे सुसाट जात आहेत. अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
मंगळवेढा तालुक्यात सध्या कोरोनाचे १६७१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केवळ एप्रिल महिन्यातील आकडेवारी असल्याने आणखीन कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे. दररोज ४०० ते ५०० नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे. मोकाट हिंडणाऱ्या व एका जागी घोळका करून थांबणाऱ्यांवर वेळीच कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.