कोरोनाग्रस्तांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:01+5:302021-04-15T04:21:01+5:30

सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने अनेक कोविड रुग्ण अतिदक्षता ...

Corona sufferers did not receive remedivir injection | कोरोनाग्रस्तांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळेना

कोरोनाग्रस्तांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळेना

Next

सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने अनेक कोविड रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. फुफ्फुसाला संसर्ग झाल्यानंतर त्यावर तातडीचा उपचार म्हणून रेमडेसिविर इंजेक्शन वापरले जाते. अचानक रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढल्याने याचा काळाबाजार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल व डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असल्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शन कोठे उपलब्ध आहे, याची माहिती आरोग्य विभाग व प्रशासन देत नसल्याने कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भरमसाठ पैसे मोजावे लागत आहेत.

बेडसाठीही मोजावी लागतेय अतिरिक्त रक्कम

कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अडचणींसोबतच आर्थिक फटका सोसावा लागत आहे. कोरोनाचा धाक दाखवून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात आहेत. सिटी स्कॅन सेंटरवर कोविड रुग्णांची लूट केली जात आहे. तसेच कोविड रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. बेडसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याची संधी साधत बिनबोभाट काळाबाजार सुरू असल्याने कोविड रुग्णांची लूट केली जात आहे.

Web Title: Corona sufferers did not receive remedivir injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.