विनाकारण फिरणाऱ्या ५० जणांना पकडून केली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:52+5:302021-04-22T04:22:52+5:30
टेंभुर्णी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करून विनाकारण फिरणाऱ्या ५० जणांवर टेंभुर्णी पोलिसांनी ग्रामपंचायत आरोग्य ...
टेंभुर्णी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करून विनाकारण फिरणाऱ्या ५० जणांवर टेंभुर्णी पोलिसांनी ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या मदतीने कारवाई केली, तसेच त्या सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट केली. या चाचणीत एक जण बाधित निघाला. त्याची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये करण्यात आली.
कोरोनाने थैमान घातले आहे. बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी ग्रामपंचायत व पोलिसांच्या वतीने विविध उपाययोजना अवलंबिल्या जात आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजता कुर्डूवाडी चौकात पोलिसांनी ही मोहीम राबविली. यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सरपंच प्रमोद कुटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल माने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नितीन हिलाले, ग्रामविस्तार अधिकारी मधुकर माने, गणेश केचे, सोमनाथ साळुंके, अमोल धोत्रे, शैलेश ओहोळ, सहायक फौजदार अभिमान गुटाळ, पोलीस शिपाई खंडागळे, गणेश बैरागी, किशोर घेचंद उपस्थित होते.
---
फोटो : २१ टेंभुर्णी
विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून जागेवरच अँटिजन टेस्ट करताना आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत कर्मचारी.