४७ गावांत कोरोना चाचणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:26+5:302021-05-25T04:25:26+5:30

तहसीलदार अंजली मरोड यांनी आरोग्य, पोलीस, महसूल, आदी विभागांची महत्त्वाची बैठक घेऊन २४ मे पासून प्रत्यक्षात कोरोना टेस्टिंगला सुरुवात ...

Corona testing begins in 47 villages | ४७ गावांत कोरोना चाचणीला सुरुवात

४७ गावांत कोरोना चाचणीला सुरुवात

Next

तहसीलदार अंजली मरोड यांनी आरोग्य, पोलीस, महसूल, आदी विभागांची महत्त्वाची बैठक घेऊन २४ मे पासून प्रत्यक्षात कोरोना टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. या कालावधीत असे नियोजन केल्यास कोरोना रुग्ण व मृत्यूदर खाली येण्यास मदत होणार आहे. यासाठी परिवेक्षक १८, तर टेस्टिंगसाठी आरोग्य कर्मचारी २०, असे ३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. हे शिबीर सोमवारपासून सुरू करण्यात आले असून, ते पाच दिवस चालणार आहे.

---

या गावात होणार चाचणी

मिरजगी, निमगाव, शिरवळ, गोगाव, भुरीकवठे, सांगवी खु., बादोले खु., कर्जाळ, कोन्हाळी, हंनूर, चप्पळगाववाडी, सलगर, बणजगोळ, हत्तीकणबस, भोसगे, उडगी, कलप्पावाडी, नागोरे, इब्राहिमपूर, सिंनूर, रुड्डेवाडी, तळेवाड, बिंजगेर, आंदेवाडी (ज.), चिंचोळी (मैं), कडबगाव, जेऊरवाडी, हालचिंचोळी, नाविदगी, किणी, किणीवाडी, कुरनूर, काझीकणबस, किरनळळी, चुंगी, सुलतानपूर, तडवळ, म्हैसलगे, मुंढेवाडी, केगाव बु., केगाव खु., चिंचोळी(न.), कलहिप्परगे, कुडल, अशा ४७ गावांतील कोरोना टेस्टिंग शिबिर मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

----

तालुक्यात कोरोना रुग्ण कमी होत असले तरी मृत्यूदर कायम आहे, यामुळे सोमवार २४ मे पासून कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या तालुक्यातील ४७ गावांतील टेस्टिंगला सुरु केली आहे. १८ अधिकारी, २० कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले यामुळे लवकरच तालुक्यातून कोरोना हद्दपार होईल.

- अंजली मरोड, तहसीलदार, अक्कलकोट.

----

Web Title: Corona testing begins in 47 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.