तालुक्यातील सर्व गावात कोरोनाची पिछाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:58+5:302021-06-05T04:16:58+5:30
तीन जिल्ह्याची सीमा असून पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये नागरिकांची ये-जा, मोठी बाजारपेठ, मेडिकल हब व जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेला ...
तीन जिल्ह्याची सीमा असून पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये नागरिकांची ये-जा, मोठी बाजारपेठ, मेडिकल हब व जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका यामुळे दुसऱ्या लाटेत तालुका हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाऊ लागला. सध्या हा आलेख झपाट्याने खाली येत आहे. दररोज १,२०० ते १,५०० रॅपिड टेस्ट तर १०० ते १५० आरटीपीसीआर टेस्ट सुरू आहेत. गावोगावी सुरू असलेली कोविड केअर सेंटर, प्रशासनाच्या उपाययोजना, नागरिकांचे सहकार्य आदी बाबींमुळे कोरोनाचा आलेख खाली येताना दिसत आहे.
तालुक्याचा कोरोना प्रवास
२८ मे २०२० रोजी कोविडचा तालुक्यात पहिला रुग्ण आढळला. पहिल्या लाटेत सर्वाधिक २१ जून रोजी १५६ पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली. दुसऱ्या लाटेत ७ मे रोजी ५५५ पॉझिटिव्ह सर्वाधिक संख्या ठरली. मे २०२१ अखेर ४.३६ टक्के रूग्णसंख्या राहिली. यातील १४ टक्के रूग्णांना हॉस्पिटल गाठावे लागले. यातील ९४ टक्के रूग्ण बरे झाले. यात १.४८ टक्के मृत्यूदर राहिला. २ जून २०२१ च्या रिपोर्टनुसार बहुतांश गावात नव्याने पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या एक अंकी होती. ७०-७५ गावांतील रुग्णसंख्या शून्यावर स्थिरावली. त्यामुळे कोरोनाची पिछेहाट सुरू झाली आहे.
कोट :::::::::::::::::::
कोरोना वाढीचा वेग मंदावला असला तरी पूर्णतः गेला नाही. अशावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी टेस्ट करून घ्यावी. शिवाय नागरिकांनी प्रतिबंधात्मक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
- डॉ. रामचंद्र मोहिते
तालुका वैद्यकीय अधिकारी