नरखेड मध्ये २५० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:01+5:302021-03-27T04:23:01+5:30
नरखेड मध्ये २५० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण नरखेड : मोहोळ तालुक्यातील नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या नरखेड, डिकसळ, ...
नरखेड मध्ये २५० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
नरखेड : मोहोळ तालुक्यातील नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या नरखेड, डिकसळ, मसले चौधरी देगाव (वा),एकुरके ,यल्लमवाडी ,
बोपले , हिंगणी , भोयरे,खुनेश्वर, भांबेवाडी, शिरापूर, मोरवंची आदी गावामध्ये २६ मार्च अखेर २५० जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याची माहिती नरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण बंडगर यांनी दिली.
१५ मार्च पासून नरखेड केंद्रात लसीकरणास सुरुवात झाली असून २६ मार्च अखेर रक्तदाब, मधुमेह, यासह दुर्धर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिक, पोलिस कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी अशा २५० जणांना लसीकरण केले आहे.
१ एप्रिल पासून ४५ वर्षाच्या वरील सर्वाना लसीकरण करणार येणार असल्याचे डॉ. बंडगर यांनी सांगितले.
यासाठी आरोग्य सेविका उज्वला व्यवहारे, गायकवाड ए. बी., शेख जे. आर.,
सुरवसे एस. बी, सुतार एसौ बी., कोळी सुतार, भिसे आदी आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
२६नरखीड- लसीकरण
लसीकरण करतेवेळी चा पाठवित आहे.