कुरुल आरोग्य केंद्रातून ३८५ जणांना दिली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:26+5:302021-04-04T04:22:26+5:30

कुरुल : मोहोळ तालुक्यातील कुरुल प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३८५ जणांना ...

Corona vaccine given to 385 people from Kurul Health Center | कुरुल आरोग्य केंद्रातून ३८५ जणांना दिली कोरोना लस

कुरुल आरोग्य केंद्रातून ३८५ जणांना दिली कोरोना लस

Next

कुरुल : मोहोळ तालुक्यातील कुरुल प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३८५ जणांना लस देण्यात आली आहे. ६० वर्षावरील लोकांना व ४५ ते ५९ वयाच्या लोकांना, अंगणवाडी सेविका, मदतनीस , शासकीय कर्मचारी यांची ऑनलाइन नोंदणी करून शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब,रक्तातील ऑक्सिजनची पातळी, तापमान, पल्सरेट यांच्या नोंदणी केल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय घाटुळे यांनी दिली.

२५ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सोलापूर जिल्ह्यासह सर्वत्र सुरुवात करण्यात आली आहे. लसीबाबत शंका निर्माण होऊ नये आणि नागरिक, महिला, शासकीय, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून कुरुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध शासकीय विभागाच्या प्रमुखांना कोरोना प्रतिबंधित लस देण्यात आली. त्यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच खासगी रुग्णालयातील नोंदणीकृत डॉक्टर, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी यावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ विकास भांगे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायत समितीचे सदस्य जालिंदर लांडे, शिवसेना तालुका उपप्रमुख विनोद आंबरे, सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी, माणिक पाटील, बाळासाहेब लांडे यांनी लस घेतली. यावेळी औषध निर्माण अधिकारी एस.डी. शिंदे, आरोग्य सहाय्यक एम.एन सुतार, आरोग्य सेविका एस.आर. बनकर, एस. एस .जाधव, वैशाली निंबाळकर, आरोग्य सेवक पी.आर. कदम, प्रतिभा पाटील, एस.आर. सदाफुले,

एस.सी. राठोड, एम.एम. जोगदंडकर, गटप्रवर्तक सुवर्णा साळुंखे, परिचर लता पुकाळे उपस्थित होते.

--

०३ कुरुल

कोरोना प्रतिबंधक लस घेताना पंचायत समितीचे सदस्य जालिंदर लांडे

Web Title: Corona vaccine given to 385 people from Kurul Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.