दोन टप्प्यात ४८२२ जणांना दिली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:52+5:302021-03-08T04:21:52+5:30
पहिल्या टप्प्यात माळशिरस तालुक्यातील सरकारी व खाजगी डाॅक्टर्स व त्यांच्या स्टाफसह, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स अशा ४७११ ...
पहिल्या टप्प्यात माळशिरस तालुक्यातील सरकारी व खाजगी डाॅक्टर्स व त्यांच्या स्टाफसह, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स अशा ४७११ जणांना लसीकरण केले. दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. यामध्ये १११ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. याबरोबरच पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला २८ दिवस पूर्ण करणाऱ्यांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येत आहे. आतापर्यत ६९० जणांना दुसरा डोस दिला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिली.
कोव्हिड १९ लसीकरण शासकीय दवाखान्यात मोफत तर खाजगी दवाखान्यात २५० रुपये आकारले जात आहेत. लसीकरणाला जाताना नोंदविलेले आयडी प्रुफ सोबत घेऊन जाणे, गंभीर आजार असेल तर वैद्यकीय सर्टीफिकीट सोबत घेऊन जावे, असे आवाहन माळशिरस पंचायत समिती आरोग्य विभागातर्फे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते यांनी केले आहे.
आम्ही लस घेतली आपणही घ्या..
अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व सुलक्षणादेवी मोहिते-पाटील या उभयतांनां कोविशिल्ड लसीकरण केले. त्यानंंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही लस घेतली आहे, आपणही घ्या, असा संदेश मोहिते-पाटील उभयतांनी दिला.