Solapur: सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण
By Appasaheb.patil | Published: March 24, 2023 07:37 PM2023-03-24T19:37:26+5:302023-03-24T19:38:11+5:30
Corona Virus: सोलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ९ कोरोना रूग्ण आढळून आले.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ९ कोरोना रूग्ण आढळून आले. यातील ५ पुरूष तर ४ स्त्री रूग्ण आहेत. सोलापुरातील रूग्णसंख्या ३५ वर पोहोचली आहे.
गुरूवारी ११३ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील १०४ रूग्ण निगेटिव्ह आढळून आले तर ९ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दाराशा, जिजामाता, मुद्रा सनसिटी, रामवाडी, साबळे, सोरेगांव नागरी आरोग्याच्या हद्दीत रूग्ण आढळून आले आहेत. १६ ते ३० वयोगटातील ४, ३१ ते ५० वयोगटातील १, ५१ ते ६० वयोगटातील २ व ६० वर्षापुढील रूग्ण २ आढळून आले आहेत. सोलापूर शहरात आतापर्यंत ४३ हजार ६२४ तर मृतांची संख्या १ हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील बाधितांची संख्या ३५ एवढी आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.