Corona Virus: सोलापूर ग्रामीणमधील कोरोनाची रुग्णसंख्या पोहोचली २० वर; अक्कलकोट, मंगळवेढ्यात रुग्ण नाही
By दिपक दुपारगुडे | Published: April 5, 2023 05:02 PM2023-04-05T17:02:41+5:302023-04-05T17:02:57+5:30
Solapur: सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात दोन नव्या रूग्णांची भर पडली.
- दीपक दुपारगुडे
सोलापूर - सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात दोन नव्या रूग्णांची भर पडली. सध्या सोलापूर ग्रामीण भागात २० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यात एकही कोरोनाचा रूग्ण नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी ४६ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यातील ४४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची संख्या ५ एवढी आहे. ग्रामीण भागात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या १ लाख ८७ हजार ४६६ तर मृतांची संख्या ३ हजार ७३१ वर पोहोचली आहे. रूग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १ लाख ८३ हजार ७१५ एवढी आहे. बार्शी १, करमाळा २, माढा ३, माळशिरस ३, मोहोळ ३, पंढरपूर ४, सांगोला १, दक्षिण सोलापूर १, उत्तर सोलापूर १ असे एकूण २० रूग्ण जिल्ह्यात आहेत.
मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात एकही कोरोनाचा रूग्ण नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने अहवालात नमूद केले आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरावा, कोणत्याही आजाराची लक्षणं दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे, कोणताही आजार अंगावर काढू नये असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.