मराठा सेवा संघातर्फे कोरोना योद्ध्यांचा पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:02+5:302021-09-04T04:27:02+5:30
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, तालुका अध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते, कार्याध्यक्ष ...
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, तालुका अध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते, कार्याध्यक्ष निनाद पाटील, सचिव राजेंद्र मिसाळ, अशोक रणवरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य प्रिया नागणे, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा जाधव, नलिनी साळुंखे, अक्काताई माने, हौसाजीराव देशमुख, सुरेश शिंदे, ॲड. नागेश काकडे, ॲड. जे. एम. पाटील, बबनराव शेंडगे आदी उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
डॉ. राजीव राणे, डॉ. तानाजी कदम, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. मनीषा शिंदे, डॉ. भारत गायकवाड, जीवनकला रोटे, मनीषा जाधव, प्रियंका काटकर, आकांक्षा मोरे, सुनीता शिंगाडे, मीना मोरे, माधुरी गायकवाड, कल्पना जाधव आदी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आरोग्य सेविका, सुपरवायझर व आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
देशी ५० रोपांचे वाटप
निम्बस फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक ॲड. जी. पी. कदम यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ५० देशी बहावा झाडांचे कोरोना योद्ध्यांना मोफत वाटप केले. मराठा सेवा संघातर्फे ॲड. कदम यांचा सत्कार केला.
फोटो ओळी ::::::::::
कोरोना योद्धा पुरस्काराने डॉ. राजीव राणे, कविटकर यांना सन्मानित करताना उत्तमराव माने-शेंडगे, डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. तानाजी कदम आदी.