कोरोना महामारीत टेंभुर्णीचा ऑक्सिजन प्लांट ठरतोय जीवनदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:09+5:302021-04-15T04:21:09+5:30

सध्या ऑक्सिजनची मागणी वाढल्याने १५ ते १६ तास वेटिंग करावे लागते. टेंभुर्णी एमआयडीसीमध्ये एस.एस. फिलर्स या नावाने थेट ...

Corona's epidemic is proving to be a life-saving oxygen plant | कोरोना महामारीत टेंभुर्णीचा ऑक्सिजन प्लांट ठरतोय जीवनदायी

कोरोना महामारीत टेंभुर्णीचा ऑक्सिजन प्लांट ठरतोय जीवनदायी

Next

सध्या ऑक्सिजनची मागणी वाढल्याने १५ ते १६ तास वेटिंग करावे लागते. टेंभुर्णी एमआयडीसीमध्ये एस.एस. फिलर्स या नावाने थेट हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारा प्रोजेक्ट गेल्या पाच वर्षापासून कार्यान्वित आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने हा प्रोजेक्ट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या प्रकल्पाची दररोज ५५० ते ६०० सिलिंडर गॅस तयार करण्याची क्षमता आहे.

सध्या ऑक्सिजनची मागणी वाढल्याने या ठिकाणी सुमारे १५ ते १६ कामगार २४ तास हा प्रोजेक्ट चालवत आहेत. प्रशासनाच्या आदेशाने इंडस्ट्रीयल ऑक्सिजन पुरवठा बंद ठेवला असून, फक्त कोरोना रुग्णांसाठीच ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या ऑक्सिजन उत्पादनावर थेट जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. या प्रकल्पातील ऑक्सिजन सध्या बार्शी, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा तसेच गरज भासल्यास सोलापूर येथे पाठवला जात आहे.

---

..असा तयार होतो ऑक्सिजन

या प्रोजेक्टमध्ये ४० केजी प्रेशरने थेट हवा आत ओढली जाते. या हवेवर प्रक्रिया करून ऑक्सिजन वेगळा केला जातो. नंतर या ऑक्सिजनला मायनस १९८ डिग्री टेम्परेचर दिले जाते व त्याचे द्रवात रूपांतर केले जाते. हाच द्रवरूप ऑक्सिजन व्हेपराइज करून सिलिंडरमध्ये भरून ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो. या प्रोजेक्टमध्ये ४० केजी प्रेशरने थेट हवा आत ओढली जाते. या हवेवर प्रक्रिया करून ऑक्सिजन वेगळा केला जातो. नंतर या ऑक्सिजनला मायनस १९८ डिग्री टेम्परेचर दिले जाते व त्याचे द्रवात रूपांतर केले जाते. हाच द्रवरूप ऑक्सिजन व्हेपराइज करून सिलिंडरमध्ये भरून ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो.

-----

पाच वर्षांपासून आम्ही हा प्रकल्प तोट्यात चालवत आहोत. अनेकांनी हा प्रकल्प विकण्याचा सल्ला दिला. आज या प्रकल्पामुळे अनेकांचे जीव वाचत आहेत याचे समाधान आहे. येथे आमचे संपूर्ण कुटुंब राबत आहे. यामध्ये माझा मुलगा अमित व पुतण्या लक्ष्मण शिंदे यांचा समावेश आहे. शासनाने अशा प्रकल्पास आर्थिक मदत करावी.

- राजाभाऊ शिंदे,

प्रकल्प संचालक

Web Title: Corona's epidemic is proving to be a life-saving oxygen plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.