वाळूजमध्ये कोरोनाचा चौथा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:10+5:302021-04-30T04:27:10+5:30
पाच दिवसांपूर्वीच त्यांचे वडील गौतम चांगदेव कादे (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तर बुधवारी एकाच दिवशी २४ जण पॉझिटिव्ह ...
पाच दिवसांपूर्वीच त्यांचे वडील गौतम चांगदेव कादे (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
तर बुधवारी एकाच दिवशी २४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५६ झाली आहे. १३ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान कोरोना बळी चार आणि वेगवेगळ्या कारणाने सहा व्यक्तींचे निधन झाले. सध्या वाळूज गाव कंटेनमेंट झोन जाहीर करूनही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी, झेडपी शाळेचे कर्मचारी, आशा वर्कर दररोज सर्व्हे करतात. तरीही रुग्णसंख्या वाढतच आहेत. कुटुंबातील कर्तेकरविते गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. पाचच दिवसात वडील-मुलाचे निधन झाल्यामुळे गावात शोक व्यक्त केला जात आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गावातच कोविड सेंटर चालू करावे, अशी मागणी होत आहे. गावातील नागरिकांनी कोरोना चाचणी करण्यासाठी शंकर झेंडे, आर शेख, भारती नगूरकर, सुमन कुंभार, हनुमंत कादे, नितीन गुंड, विजयकुमार आतकरे, युवराज यादव, सीमा तुळजापुरे, सत्त्वशीला यादव हे प्रयत्न करत आहेत.