कोरोनाचा कहर.. कोविड सेंटर फुल्ल, क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:05+5:302021-04-24T04:22:05+5:30
करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत आरटीपीसीआर १०७१ टेस्ट घेण्यात आल्या असून, त्यापैकी ७२४ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत तर ८९५४ निगेटिव्ह निघाले ...
करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत आरटीपीसीआर १०७१ टेस्ट घेण्यात आल्या असून, त्यापैकी ७२४ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत तर ८९५४ निगेटिव्ह निघाले आहेत. ४७ हजार ९१७ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून, त्यापैकी ३८८१ पॉझिटिव्ह निघाले आहेत तर ४४ हजार ३६ निगेटिव्ह निघाले आहेत.
एकूण ५८ हजार ८८ जणांच्या घेतलेल्या टेस्टमध्ये ४६०५ पॉझिटिव्ह व ५२ हजार ९९० निगेटिव्ह निघाले आहेत.
सध्या १९ होम क्वारंटाईन, ५११ कोविड सेंटरमध्ये, ६७ अन्यत्र तर ५१ जण तालुक्याबाहेर उपचार घेत आहेत. करमाळा येथील कोविड सेंटरमध्ये क्षमतेच्या दुप्पट रुग्ण ठेवले आहेत. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील केंद्राची क्षमता १५० असून, तेथे ३३७ रुग्ण दाखल आहेत. कमलाई हॉस्पिटलमध्ये फक्त २५ ची क्षमता असून, तेथे २१ रुग्ण दाखल आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० ची क्षमता असून, तेथे १० जण दाखल आहेत. शहा हॉस्पिटलची १० ची क्षमता असून, तेथे ३६ रुग्ण दाखल आहेत.
---------
१८३९ जणांना लस
करमाळा तालुक्याला ८२ हजार ७५९ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रतिदिनी पाच केंद्रावर १८३९ व्यक्तींना लस दिली जाते. आत्तापर्यंत ६२१४ व्यक्तींना पहिला डोस दिला असून १४२५ लोकांना दुसरा डोस दिला आहे. अशी एकूण ७६३९ जणांना लस देण्यात आली आहे. नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन करमाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
----