कोरोनाचा कर वसुलीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:09+5:302021-04-20T04:23:09+5:30
करवसुली अधिकारी मयुरी शिंदे म्हणाल्या, एकूण वसुलीमध्ये घरपट्टीची वसुली ही १५ कोटी ७१ लाख ८४ हजार तर पाणीपट्टीची १ ...
करवसुली अधिकारी मयुरी शिंदे म्हणाल्या, एकूण वसुलीमध्ये घरपट्टीची वसुली ही १५ कोटी ७१ लाख ८४ हजार तर पाणीपट्टीची १ कोटी ९ लाख रुपये झाली. चालू मागणी ही १६ कोटी होती. त्यातील ११ कोटी रुपये वसूल झाले आहेत. यात पाणीपट्टीची मागणी ही १० कोटी ७० लाख रुपये होती. त्यातील ४ कोटी ५२ लाख रुपये थकबाकीसह वसूल झाले. यात चालू पाणीपट्टी ४ कोटी ९९ लाख आहे.
मार्च महिन्याच्या एकूण बाकी ३ कोटी ५६ लाख ५९ हजार रुपये वसूल झाले. बार्शी शहरात ३२ हजार मालमत्ताधारक आहेत. नागरिकांनी थकबाकी भरून पालिकेला सहकार्य करावे. या थकबाकीला महिना दोन टक्के दंड आहे. तो टाळण्यासाठी कर भरावा, असे मयुरी शिंदे यांनी सांगितले.