सोलापूरच्या खाजगी रुग्णालयातील महिला कर्मचाºयाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:28 PM2020-04-14T12:28:09+5:302020-04-14T17:41:16+5:30

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आवाहन

Corona's test positive for a private hospital nurse in Solapur | सोलापूरच्या खाजगी रुग्णालयातील महिला कर्मचाºयाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

सोलापूरच्या खाजगी रुग्णालयातील महिला कर्मचाºयाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापुरातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाची संख्या वाढत आहेसोलापुरातील जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्कसोलापूर शहर पोलिसांनी केली कसून चौकशी सुरू

सोलापूर : सोलापुरात कोरोनामुळे एका दुकानदाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 91 जणांचे स्वँब तपासण्यात आले. यातील 67 जणांचे हाती आले आहेत. यामध्ये खाजगी रुग्णालयातील एका महिला कर्मचाºयाला
कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. अद्याप चोवीस जणांचे अहवाल हाती येणे बाकी आहे.

कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे तेलंगी पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता.  या दुकानदाराने गेल्या महिनाभरात बाहेरगावी प्रवास केला नसल्याचे कुटूंबीय सांगत होते. त्यामुळे त्यांना नेमकी कोणापासून कोरोनाची लागण झाली याचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले होते. त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयातील एका महिला कर्मचाºयाचा संपर्क आल्याने त्या महिला कर्मचाºयाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. 

आरोग्य विभागाने रविवारी रात्री तेलंगी पाच्छा पेठेकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. मृताचे कुटूंबीय, संपर्कात आलेल्या लोकांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी त्यांची तपासणी झाली. त्यापैकी 66 जणांचे रिपोर्ट आले असून त्यात एका नर्स महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. 

Web Title: Corona's test positive for a private hospital nurse in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.