कोरोनामुक्त गाव अभियानाची नरखेडमध्ये सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:46 AM2020-12-17T04:46:23+5:302020-12-17T04:46:23+5:30
नरखेड : मोहोळ पंचायत समिती आणि नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे गाव कोरोनामुक्त ...
नरखेड : मोहोळ पंचायत समिती आणि नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’या अभियानाला नरखेड येथे सुरुवात झाली. सोसायटीचे चेअरमन जयवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला सुरुवात झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण बंडगर, डॉ. समीर पटेल यांनी सर्वसामान्यांना शपथ दिली.
इंग्लिश स्कूल नरखेड प्रशालेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गावातून जनजागृती करत रॅली काढून शपथ देण्यात आली. यावेळी जयवंत पाटील, सुनीता सोनार, ग्रामसेवक तात्यासाहेब नाईकनवरे, बाळासाहेब शिंदे, उत्तम मोटे, इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नागणे, प्राचार्य मोहन मोटे,झेडपी प्राथमिक शाळा, पाटील विद्यालय, इंग्लिश स्कूल येथील शिक्षक, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते .
---
फोटो : १६ नरखेड
कोरोनामुक्त गाव शपथ घेताना नागरिक.