कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 09:37 PM2020-03-14T21:37:41+5:302020-03-14T21:39:43+5:30

रुग्ण कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा केला होता दावा; कॉलेज प्रशासनाने दिली पोलिसात तक्रार

Coroner's crime sparked in Pandharpur | कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल

कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देकोरूना वायरच्या या आजाराने जगभरात घातले थैमानराज्यातील अनेक शाळा महाविद्यालयांना दिली शासनाने सुट्टीकोरोना वायरस बाबत जनजागृतीसाठी प्रशासन सज्ज

पंढरपूर : कोरोनाची अफवा पसरवली व कॉलेजची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात स्वेरी कॉलेजचे प्रा. मुकुंद मारुती पवार यांनी शनिवारी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपुरातील विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन ' महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण’ स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता विद्यार्थी; संस्थेने फेटाळला सुट्टीचा अर्ज’ अशा आशयाचा मजकूर एका वृत्तवाहिनीच्या लोगोचा वापर करुन खोटी बातमी तयार केली.

स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाने ती बातमी पाहिली. त्यानंतर त्या पालकाने कॉलेजमधील प्राध्यापकांना फोन करुन संबंधीत बातमीबाबत चौकशी केली. परंतु असा कोणताही प्रकार घडला नव्हता. त्यामुळे प्राध्यापकांनी घाबरु नका, असा प्रकार घडला नाही, असे सांगितले.

त्या बातमीद्वारे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. तसेच श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरी कॉलेज आॅफ इंजिनिअरींगची बदनामी केली म्हणून प्राध्यापक मुकुंद पवार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

------------------------------------------------
दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीचा शोध सायबर पोलिसांमार्फत घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आणखी कोणी अफवा पसरवल्यास त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- किरण अवचर
पोलीस निरिक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे

Web Title: Coroner's crime sparked in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.