शासकीय रूग्णालयातील प्रयोगशाळा प्रमुखांचा पदभार काढला; जाणून घ्या...काय आहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:09 PM2021-01-14T13:09:21+5:302021-01-14T13:09:27+5:30

कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याने प्रयोगशाळा प्रमुखांचा पदभार काढला

The coroner's test report was pending and the head of the laboratory was removed | शासकीय रूग्णालयातील प्रयोगशाळा प्रमुखांचा पदभार काढला; जाणून घ्या...काय आहे कारण

शासकीय रूग्णालयातील प्रयोगशाळा प्रमुखांचा पदभार काढला; जाणून घ्या...काय आहे कारण

googlenewsNext

सोलापुर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिविल हॉस्पिटल) सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे डॉ. सुरेश कंदले यांच्याकडून प्रयोगशाळा प्रमुखाच्या पदभार काढण्यात आला. कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसापासून कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित राहत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयोगशाळा प्रमुखांकडे विचारणा केली. त्यानंतर प्रयोगशाळा प्रमुखाचा पदभार काढण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना दिले. या आदेशानुसार डॉ. संजीव ठाकूर यांनी कोरोना चाचणीसाठी असलेल्या प्रयोगशाळा प्रमुखाचा पदभार डॉ. नसिरा शेख यांच्याकडे सोपवला आहे.

Web Title: The coroner's test report was pending and the head of the laboratory was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.