सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार कॉर्पोरेट सॅलरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 03:05 PM2018-12-24T15:05:17+5:302018-12-24T15:06:32+5:30
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ८ हजार ७६२ शिक्षक आहेत. या शिक्षकांचा पगार स्टेट बँकेमार्फत केला जातो. ...
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ८ हजार ७६२ शिक्षक आहेत. या शिक्षकांचा पगार स्टेट बँकेमार्फत केला जातो. शिक्षकांच्या बँक खात्यास कॉर्पोरेट सॅलरीचा दर्जा द्यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा संघटक संजय ननवरे यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे केली होती. त्यावर सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी शिक्षण विभागाला याबाबत सूचना केल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी बँकेच्या अधिकाºयांशी समन्वय साधून शिक्षकांची खाती अपग्रेड करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार शिक्षक संघटनांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व संघटनांनी बँकांमध्ये जाऊन खाती अपग्रेड करण्याबाबत अर्ज केले आहेत.
शिक्षकांची खाती अपग्रेड केल्यामुळे हे फायदे होणार आहेत. खाते शून्य बॅलन्स झाले, कोणत्याही बँकेच्या एटीएमवरून पैसे कितीही वेळा काढल्यास चार्जेस लागत नाहीत, मागणीनुसार क्रेडिट कार्ड, २0 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा, विमान अपघात प्रकरणी ३0 लाखांपर्यंत विमा संरक्षण,पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, शैक्षणिक लोन यावर व्याजदरात सूट,जमेवर जादा व्याज,डीमॅट अकाउंट सेवा,चेक बुक, सर्व आॅनलाईन व्यवहार मोफत, सध्या २00 रुपये वार्षिक परस्पर बँक कपात करते.डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर मिळणाºया सवलतीची माहिती बँक वेळोवेळी देत राहील.
कर्मचाºयांना गरजेच्यावेळी दोन महिन्याच्या पगारीइतकी उचल मिळेल, पगार उशिरा झाल्यास कर्मचाºयांना या सुविधेचा लाभ घेता येईल. बँकेच्या नियमानुसार ३0 कर्मचारी असलेल्या कुठल्याही आस्थापनेस ही सुविधा देता येते पण जिल्ह्यातील झेडपी शिक्षक या सुविधेपासून वंचित होते. त्यामुळे वर्षाकाठी हजारो रुपये बँकेकडून वसूल केले जात होते. या सुविधेसाठी जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे, सरचिटणीस रामराव शिंदे,किरण काळे,संजय ननवरे, दयानंद चव्हाण, किरण सगेल, प्रशांत लंबे, नागेश भाकरे आदींनी पाठपुरावा केला.