नगरसेवक नरोटेविरुद्ध गुन्हा

By admin | Published: May 17, 2014 11:57 PM2014-05-17T23:57:17+5:302014-05-17T23:57:17+5:30

काँग्रेसचे नगरसेवक चेतन पंडित नरोटे (रा. १०४, मुरारजीपेठ, रामलाल चौक, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Corporator Narot crime | नगरसेवक नरोटेविरुद्ध गुन्हा

नगरसेवक नरोटेविरुद्ध गुन्हा

Next

सोलापूर : रामवाडी गोदामात लोकसभा निवडणूक मतमोजणीच्यावेळी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर मोबाईलवर संभाषण करणारे काँग्रेसचे नगरसेवक चेतन पंडित नरोटे (रा. १०४, मुरारजीपेठ, रामलाल चौक, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

. फौजदार दत्तात्रय कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक नरोटे यांच्याविरुद्ध भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणीच्यावेळी मोबाईल, रेडिओ, पेजर, शस्त्र व इतर घातक वस्तू वापरण्यास मनाई करण्यात आली होती. असे असताना १६ मे रोजी सकाळी १० वाजता ग्रीन गोदामावर मतमोजणी सुरू असताना नगरसेवक नरोटे हे मतमोजणी केंद्रात मोबाईलवर संवाद करीत होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम समोर आले तरी त्यांचा मोबाईलवर संवाद सुरू होता. ही बाब निदर्शनाला येताच त्यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास सहायक फौजदार जैन करीत आहेत. 

Web Title: Corporator Narot crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.