महापालिका सभेला उपस्थित असलेल्या या नगरसेवकाला झाली कोरोनाची लागण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:18 PM2020-09-17T16:18:21+5:302020-09-17T16:18:29+5:30

५० हून अधिक नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा, सर्वांना व्कारंटाइन करण्याच्या आरोग्य विभागाच्या हालचाली

The corporator, who was present at the municipal meeting, contracted corona | महापालिका सभेला उपस्थित असलेल्या या नगरसेवकाला झाली कोरोनाची लागण 

महापालिका सभेला उपस्थित असलेल्या या नगरसेवकाला झाली कोरोनाची लागण 

Next

सोलापूर : महापालिकेतील वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे यांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे. चंदनशिवे सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. त्यामुळे या सभेला उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, नगरसेविक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि गॅलरीत थांबलेले नागरिक यांना होम व्कारंटाइन करता येईल का? या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. 


आनंद चंदनशिवे यांनी मंगळवारी सभेला येण्यापूर्वी सकाळी अँटीजेन टेस्ट करुन घेतली होती. ही टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे ते सभेला हजर झाले. सकाळी ११.३० ते दुपारी एक वाजेपर्यंत ते सभागृहातच थांबून होते. या कालावधीत ते बराच भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. अधिकारी, पत्रकारांशी हितगूजही करीत होते. काही वेळानंतर ते सभेतून बाहेर गेले. घरी जाताच त्यांना अंगदुखीचा त्रास झाला. उपचारासाठी ते मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. टेस्टचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याचे चंदनशिवे यांनीच 'लोकमत'ला सांगितले. माझी प्रकृती चांगली आहे. लवकरच मी बरा होईन. कार्यकर्त्यांनी, मित्रांनी काळजी करु नये, असे आवाहन चंदनशिवे यांनी केले. 


दरम्यान, महापालिकेच्या सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या सभेला उपस्थित असलेल्या नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार आणि अधिकाऱ्यांची ऑक्सीमीटर, थर्मामिटरने तपासणी करुन सोडण्यात आले होते. या सर्वांची नावे, मोबाईल क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. या सर्वांना पाच दिवसांसाठी होम क्वारंटाइन करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: The corporator, who was present at the municipal meeting, contracted corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.