शेळ्या घेतल्या अन्‌ दिल्या बनावट नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:14+5:302021-01-25T04:22:14+5:30

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शेळ्या-मेंढ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. येथे शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीची कोट्यवधी ...

Counterfeit notes given to goats | शेळ्या घेतल्या अन्‌ दिल्या बनावट नोटा

शेळ्या घेतल्या अन्‌ दिल्या बनावट नोटा

Next

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शेळ्या-मेंढ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. येथे शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या बाजारात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, बार्शी, करमाळा या तालुक्यातील शेतकरी आपल्या शेळ्या-मेंढ्या विकण्यासाठी येतात. तर खरेदीसाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मिरज, सांगली, कर्नाटक या भागातील व्यापारी बकरी खरेदीसाठी येतात.

शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोखरापूर (ता. मोहोळ) येथील शेतकरी कुंडलिक लेंगरे हे दोन मेंढ्या व सहा बकरी घेऊन मोडनिंब बाजारात विक्रीसाठी बसले होते. त्यांच्याजवळ सिद्धेश्वर कैंचे नावाचा तरुण आला. त्याने ३९ हजार ५०० रुपयाला आठ बकऱ्यांचा व्यवहार ठरवला. खरेदी केलेल्या बक-या पिकअपमध्ये टाकून तो तरुण मोहोळकडे जात असताना शेटफळजवळ पोलिसांनी त्याचे पिकअप वाहन अडवून हटकले आणि नागरिकांच्या मदतीने त्याला अटक केली.

मोडनिंब औट पोस्टचे शिवाजी भोसले व असिफ आतार यांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे दोन हजार व पाचशे रुपयांच्या ६७ हजार रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्या. नोटांसह त्याला ताब्यात घेण्यात आले.

----

मक्याच्या शेतातून पकडले

पोलिसांनी अडवल्याने तो तरुण गडबडला. तो पळून जात असताना बाजारातील युवकांनी प्रसंगावधान राखून पाठलाग केला आणि मोडनिंबपासून दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे लाईनलगत मका पिकाच्या शेतातून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी बकऱ्यासह पकडलेले वाहन ताब्यात घेतले. ज्या शेतकऱ्यांकडून शेळ्या घेतल्या त्यांना परत देण्यात आल्या. पोलिसांनी आणखी एका आरोपी अटक केले.

-----

रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

सदर घटनेमुळे आठवडी बाजारात जनावरे व शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील अशिक्षित व शिक्षित शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बनावट नोटा बनवणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, टेंभुर्णी पोलीस याचा शोध घेत आहेत. यातून मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Counterfeit notes given to goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.