मतमोजणीसाठीचे कर्मचारी दोन दिवस रामवाडीतच मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 03:55 PM2019-05-22T15:55:46+5:302019-05-22T15:59:42+5:30
सोलापूर, माढा लोकसभेतील मतदानाची उद्या मतमोजणी
सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. सोलापुरातील रामवाडी गोदामात यासाठी मतमोजणी कर्मचाºयांना सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे मोजणी प्रक्रियेतील सुमारे दीड हजार कर्मचाºयांचा दोन दिवस मुक्काम रामवाडी गोदामाच्या परिसरातच राहणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करणारे कर्मचारी आज बुधवारी सायंकाळी सोलापुरात मुक्कामासाठी येत आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी सर्व विभागातील सुमारे अडीच हजार कर्मचाºयांचा ताफा असणार आहे. सोलापूर शहराबाहेर राहणाºया कर्मचाºयांना मतमोजणीच्या दिवशी सकाळी लवकर उपस्थित राहता यावे यासाठी रामवाडी परिसरातील केंद्रीय विद्यालय व अन्य एका खासगी मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीतील प्रत्येक फेरीचा निकाल निवडणूक आयोगाच्या सुविधा अॅपवर कर्मचाºयांना द्यावा लागणार आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदानाच्या स्लिपांचीही मोजणी करावी लागणार आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी रात्रभर सुरू राहणार आहे.
त्यामुळे या कर्मचाºयांची रात्र दुसºया दिवशीही गोदामातच जाणार आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी दोन दिवस कर्मचाºयांना ठाण मांडून बसावे लागणार आहे.
अधिकाºयांनी गोदामात ठोकला तळ
मतमोजणीची प्रक्रिया केवळ एक दिवसावर आल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले, माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांच्यासह अन्य समन्वय अधिकाºयांनी मंगळवारी सकाळपासूनच रामवाडी गोदामात तळ ठोकला आहे. मतमोजणीसाठी आवश्यक असणाºया पूर्वतयारीची रंगीत तालीम यावेळी प्रात्यक्षिकांतून घेण्यात आली.