देशातील २०० कंपन्यांचे २ हजार ग्राहक उद्या सोलापूरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:02 PM2018-10-03T16:02:28+5:302018-10-03T16:06:38+5:30
भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय टेक्सटाईल्स प्रदर्शन : टेरी टॉवेल उत्पादकांचा समावेश
सोलापूर : सोलापूरातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल उत्पादकांसाठी प्रदर्शन सोलापूरात भरविण्यात आले आहे. टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फौडेशन (टीडीएफ) च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उदघाटन गुरूवार ४ आॅक्टोबर दुपारी ४ वाजता हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर येथे होणार आहे. या प्रदर्शनात देशातील २०० कंपन्यांचे २ हजार ग्राहक आज होणाºया प्रदर्शनात सहभाग नोंदविणार असल्याची माहिती जगदविख्यात मार्केटिंग सल्लागार जगत शहा (अहमदबाद), टीडीएफचे अध्यक्ष राजेश गोसकी, उपाध्यक्ष श्रीनिवास बुरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोउद्योगमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ शरद बनसोडे, आ़ प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी खासदार धर्मण्णा सादूल, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्स्पो व समिट हे पहिले आणि एकमेव आंतराष्ट्रीय प्रदर्शन आहे़ टेरी टॉवेलचा ग्राहक वर्ग, टॉवेल उत्पादक, आयातदार, निर्यातदार, तंत्रज्ञ आणि व्यापारी या सर्व घटकांना एका छताखाली आणून त्यांच्यात गटचर्चा, अनुभव कथन, चर्चा संमेलन घडवून सोलापूरातील टॉवेल उद्योग कशा पध्दतीने वाढविता येईल यामागचा एकच उद्देश या प्रदर्शनाचा असणार आहे. या पत्रकार परिषदेस टीडीएफचे सचिव संजय मडूर, सिध्देश्वर गड्डम, गोविंद झंवर, जयंत आकेन, वेणुगोपाल अल्ली, गोवर्धन चाटला आदी उपस्थित होते
प्रदर्शनात भाग घेणाºया कारखानदारांना २५ देशात जाण्याची संधी
या प्रदर्शनात भाग घेणाºया कारखानदारांना अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया या पाच खंडातील किमान २६ देशात आयोजित रोड शो म्हणजेच चर्चासत्र कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे़ शिवाय या चर्चासत्रात आलेल्या परदेशी ग्रहाकांशी थेट संवाद साधण्याचा योग मिळणार आहे़ या प्रदर्शनाव्दारे परदेशी ग्राहकांसोबतच देशांतर्गत दिल्ली, अमृतसर, जयपूर, इंदौर, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद, बेंगलोर इत्यादी किमान २० प्रमुख बाजारपेठ असलेल्या शहरात चर्चासत्र व वैयक्तिक भेटी घडवून आणण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात सहभागी होणाºया उत्पादनांचे प्रकार
या प्रदर्शनात बेबी टॉवेल, बार मॉप्स, बाथ टॉवेल्स, बाथ मॉप्स, बीच टॉवेल्स, कॅबाना टॉवेल, बिबस, कोम्बड टॉवेल्स, हँड टॉवेल, हॉस्पीटल नॅपकिन्स, लॉज नॅपकिन्स, लॉज टॉवेल्स, हॉटेल टॉवेल, जेकार्ड टॉवेल, नमाज नॅपकिन, किचन नॅपकिन, किचन डस्टर्स, टेरी चप्पल, पूल टॉवेल, मुद्रीत टॉवेल, हॉस्पीटल मास्कस, वॉश ग्लोव्हज, टेक्स्टाईल मशिनरी, सुत-कापड याशिवाय संबंधित उत्पादनासाठी लागणारी रंग, रसायने आदी उत्पादने पहायला मिळणार आहेत.