ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा शक्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:27 AM2021-02-17T04:27:38+5:302021-02-17T04:27:38+5:30
सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे ...
सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने आर्थिक नियोजन करून सरपंच व सदस्यांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले तर देश महासत्ता नक्की होईल, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
सोनंद (ता. सांगोला) येथे केंद्रीय आश्रमशाळा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच समाधान पाटील, विनायक मिसाळ, प्रकाश काशीद, संजय काशीद, सुनील काशीद, दत्तात्रय खांडेकर, तुकाराम पाटील, समाधान पाटील, राजकुमार बाबर, माजी सरपंच महादेव पाटील, विजय देवकर, राजेंद्र यादव, दीपक चोथे, जितेंद्र बोत्रे, राहुल टकले, सतीश काशीद, कल्याण भोसले, हनमंतगावचे तात्यासाहेब खांडेकर, संतोष खांडेकर, दत्ता खांडेकर, बीरा झुरळे, समाधान खांडेकर उपस्थित होते.
पेरे पाटील पुढे म्हणाले, आर्थिक नियोजनाशिवाय विकास होणे शक्य नाही. मात्र, त्यावर कोणीच बोलत नाही. सध्या वीज बिल माफीचा मुद्दा चर्चेत आहे. हा मुद्दा भावनिक करून चालणार नाही, वीज बिल माफ केले तर वीज मंडळाने काय करायचे, असे अनेक प्रश्न आहेत. आपल्या गावाचा विकास आपण आपल्या पैशातून करायचा असेल तर सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन राजकारण बाजूला ठेवून आर्थिक नियोजन करावे. आज पाटोद्यासारख्या कमी लोकसंख्येच्या गावात ७५० कुटुंबांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये कर घेऊन जमा होणाऱ्या ३० लाख रुपये करातून लोकांना पिण्यासाठी आर.ओ.चे पाणी, आंघोळीला गरम पाणी, वर्षभर मोफत दळण आदी सुविधा पुरवल्या आहेत. यापुढे जे लोक आर्थिक नियोजन करतील तेच विकास करू शकतील, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक संस्थाध्यक्ष जगदीश बाबर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्राचार्य दिगंबर साळुंखे यांनी मानले.
----
फोटो : १६ भास्कर पेरे पाटील