पती-पत्नी लोटांगण घालीत निघाले पंढरपुरी पांडुरंगाच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:04+5:302021-06-17T04:16:04+5:30
दोघे संत सावतामाळी महाराज यांच्या समाधीस्थळ येथे येऊन अरण - मोडनिंब रस्त्यावरून पंढरपूरकडे दोन दिवसांपासून निघाले आहेत. ते रात्री ...
दोघे संत सावतामाळी महाराज यांच्या समाधीस्थळ येथे येऊन अरण - मोडनिंब रस्त्यावरून पंढरपूरकडे दोन दिवसांपासून निघाले आहेत. ते रात्री अरण येथे मुक्कामास होते. बुधवारी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे मुक्काम केला. पंढरपुरातील नामदेव पायरीपर्यंत ते लोटांगण घालणार आहेत.
----
शासनाने व प्रशासनाने वारकऱ्यांना जरी पंढरपूरकडे जाण्यासाठी बंदी घातली असली, तरी मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे. त्याच्या पोहोचही मला मिळाल्या आहेत. त्यामुळे शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही दोघे पती-पत्नी लाडक्या विठूरायाच्या पंढरीपर्यंत पोहोचून नामदेव पायरीपासून का असेना दर्शन घेऊन माघारी येणार आहोत.
- नागनाथ कोळी
---
फोटो : १६ मोडनिंब
मोडनिंब येथील नागनाथ कोळी, जयश्री कोळी हे दोघे लऊळ येथील श्री संत कुर्मदास यांच्या समाधी स्थानापासून लोटांगण घेत पंढरपूरला निघाले आहेत.