मोठ्या थकबाकीसाठी सोलापूर जिल्हा बँकेची न्यायालयीन लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:12 PM2018-03-08T13:12:03+5:302018-03-08T13:12:03+5:30

वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पुढाकार : आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील

Court battle for Solapur district bank for large dues | मोठ्या थकबाकीसाठी सोलापूर जिल्हा बँकेची न्यायालयीन लढाई

मोठ्या थकबाकीसाठी सोलापूर जिल्हा बँकेची न्यायालयीन लढाई

Next
ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीतविजय शुगरकडे जिल्हा बँकेची १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये थकबाकी

सोलापूर: विजय शुगरचा ताबा घेतल्यानंतर आता आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी बँकेची सध्या न्यायालयीन व प्रशासकीय लढाई सुरू आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे बँकेच्या शेतकºयांकडील वसुलीसाठी हातभार लागला आहे; मात्र मोठ्या थकबाकीदारांकडील वसुली होत नसल्याने बँकेने मालमत्ता ताब्यात घेणे व त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विजय शुगरकडे जिल्हा बँकेची सुमारे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये इतकी थकबाकी आहे. ही रक्कम वसूल होत नसल्याने बँकेने रितसर विजय शुगरच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. आता बँक या कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगरचा ताबा मिळावा यासाठी बँकेने उच्च न्यायालयात अपील केले आहे. आर्यन शुगरकडे जिल्हा बँकेचे २१९ कोटी ४१ लाख २९ हजार रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठीची प्रक्रिया कारखान्याची मालमत्ता विक्री करुनच पूर्ण होणार आहे.
आदित्यराज शुगरवर ४५ कोटींचा बोजा
माजी संचालक अरुण कापसे यांच्या आदित्यराज शुगरकडे २५ कोटी ८९ लाख ७२ हजार रुपये मुद्दल व १९ कोटी २८ लाख ४३ हजार रुपये व्याज असे ४५ कोटी १८ लाख १५ हजार रुपये थकबाकी आहे,  कर्जापोटीच जुळे सोलापुरातील गट नंबर ९/१ब, प्लॉट नंबर १२ क्षेत्र ३०४ चौरस मीटरचा ताबा घेतला आहे. 
चार कारखान्यांकडे ५६६ कोटी थकले !

  • - आर्यन शुगरकडे मुद्दल १३१ कोटी ५ लाख ९ हजार व व्याज ८८ कोटी ३६ हजार २०६ रुपये अशी २१९ कोटी ४१ लाख २९ हजार थकबाकी आहे.
  • - विजय शुगरकडे ११३ कोटी ६० लाख ७५ हजार तर व्याज ६५ कोटी ५४ लाख रुपये असे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये येणेबाकी आहे. 
  • - अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे ५८ कोटी ४६ लाख ७४ हजार रुपये मुद्दल व २९ कोटी २९ लाख ३० हजार रुपये व्याज अशी ८७ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.
  • - सांगोला साखर कारखान्याकडे ३७ कोटी १२ लाख ९३ हजार रुपये मुद्दल व ४२ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये व्याज अशी एकूण ८० कोटी ९ लाख ३३ हजार रुपये थकबाकी आहे. 
  • - विजय, आर्यन, स्वामी समर्थ व सांगोला या चार कारखान्यांकडे ५६६ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपये थकले आहेत. 

शेतकºयांना पीक असेल त्याप्रमाणे कर्ज देण्यासाठी बँकेला पैशाची गरज आहे. मोठ्या सर्वच थकबाकीदारांकडील वसुलीसाठी बँकेचा प्रयत्न आहे. वसुली आल्यानंतर शेतकºयांनाच प्राधान्याने कर्ज दिले जाणार आहे.
- राजन पाटील
अध्यक्ष, जिल्हा बँक

Web Title: Court battle for Solapur district bank for large dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.