मुरूम उपसाप्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:57+5:302021-04-05T04:19:57+5:30

बार्शी : वैराग परिसरात जवळगाव नंबर २ येथील शासकीय जागेतून चोरून मुरूम उपसा करून रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी ...

Court orders to file charges against Chaigha in Murum sub-case | मुरूम उपसाप्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुरूम उपसाप्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Next

बार्शी : वैराग परिसरात जवळगाव नंबर २ येथील शासकीय जागेतून चोरून मुरूम उपसा करून रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या.एम.एस. सबनीस यांनी वैराग पोलिसांना दिले आहेत.

बार्शीतील फौजदारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल झाली होती. यावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले.

जवळगाव नंबर दोनमधील शासकीय जागेतून व ओढे, नदी-नाले येथून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन झाले होते. रॉयल्टी न भरता दगड, माती, वाळू व मुरूम यांची चोरी झाली.

अशाच प्रकारे १३०० ब्रास मुरुम वैराग भागातील जवळगाव (२) येथून विनानंबरच्या जेसीबीद्वारे गट नं. १९४ (१) मधून मुरूम खोदून तो हत्तीज शिवरस्त्यासाठी वापरला. याबाबत विष्णू बाबासाहेब कापसे यांनी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, वैराग पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक, गौण खनिज अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याची कोणीही दखल न घेतल्याने त्यांनी बार्शी न्यायालयात धाव घेतली.

त्यावर प्राथमिक सुनावणी झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी परमेश्वर आंबरूषी ढेंगळे, अर्जुन बापू ढेंगळे, समाधान रावसाहेब ढेंगळे व रावसाहेब मच्छिंद्र ढेंगळे (सर्व रा.जवळगाव नं.२, ता. बार्शी) यांच्याविरुद्धविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

---

१५ दिवसात उपसला हजार ट्राॅली मुरुम

आरोपींनी १५ नोव्हे. २०२० ते ३० नोव्हे. २०२० या १५ दिवसांत जवळगाव नं. २ येथील शासकीय गायरान जमिनीतून सुमारे एक हजार ट्रॉली भरून जवळपास १२०० ते १३०० ब्रास मुरूम उपसा केला. तो हत्तीज शिवरस्त्यावर स्वतःच्या शेतात खासगी रस्ता तयार करण्यासाठी वापरला. फिर्यादीच्या वतीने ॲड. प्रशांत एडके, ॲड. सुहास कांबळे, ॲड. समाधान सुरवसे व ॲड. सर्फराज इनामदार यांनी काम पाहिले.

Web Title: Court orders to file charges against Chaigha in Murum sub-case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.