शेतजमीन वाटणीवरून चुलत्याने केली पुतण्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:16+5:302021-08-25T04:28:16+5:30
याबाबत ऋत्विक रमेश देशमुख यांनी प्रमोद विलासराव देशमुख व सूरज सतीश देशमुख या दोघांच्या विरोधात फिर्याद ...
याबाबत ऋत्विक रमेश देशमुख यांनी प्रमोद विलासराव देशमुख व सूरज सतीश देशमुख या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
कोळे येथील राजेंद्र जगन्नाथ देशमुख यांच्या घरामध्ये ऋत्विक देशमुख यांच्या वडिलोपार्जित जमीन वाटपाच्या संदर्भात प्रमोद विलासराव देशमुख, सूरज सतीश देशमुख, विलास मारुती देशमुख, अरविंद देशमुख, मारुती निवृत्ती सरगर असे मिळून बैठक चालू होती. या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्याने त्यांच्या घरातून तो बाहेर येऊन घराकडे जात होता. त्यावेळी चुलते प्रमोद देशमुख यांनी घराच्या बाहेर येऊन तुला मस्ती आली आहे, असे म्हणून गच्ची धरून धक्काबुक्की केली. त्यावेळी आमची भांडणे पाहून चुलत भाऊ सूरज देशमुख याने तेथे पळत येऊन शिव्या देऊ लागला. त्यावेळी त्यास शिव्या का देतोस, अशी विचारणा केल्यानंतर लाकडाने डोक्यात मारून जखमी केले.