पोलिसात तक्रार दिल्यामुळे चुलत भावानं बहिणीच्या डोक्यात घातला रॉड! सहाजणांविरुद्ध गुन्हा
By रवींद्र देशमुख | Published: December 8, 2023 06:47 PM2023-12-08T18:47:54+5:302023-12-08T18:48:18+5:30
कुमठे गावातील घटना
सोलापूर : पूर्वी झालेल्या भांडणातून पोलिसात तक्रार का दिली म्हणून चुलतभावानं लोखंडी रॉड डोक्यात राॅडनं मारल्याने बहीण जखमी झाले. अन्य पाचजणांनी लाथाबुक्क्यानं मारहाण केल्याची तक्रार रेश्मा शंकर घोडके (वय- ३२, रा. कुमठे, पाण्याच्या टाकीवजळ, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी शुक्रवारी पोलिसात गुन्हा नोंदला आहे.
मच्छिंद्रनाथ नागनाथ घोडके, अप्पू नागनाथ घोडके, सुशीला नागनाथ घोडके, वैष्णवती मच्छिंद्र घोडके, मंजुळा बळीराम माने, दिव्या यल्लालिंग धर्मसाळे (रा. लष्कर,सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी २ डिसेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास कुमठा येथील घरी असताना पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन पोलिसात तक्रार का दिली म्हणून चुलतभाऊ मच्छिंद्रनाथ याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार करुन इतरांनी लाथाबुक्क्यांने मारहाण केली. सोडवायला आलेल्या सिद्धाराम सोनकडे यांनाही मारहाण केली. जखमी झाल्याने उपचार करुन तक्रार दिल्याने गुरुवारी गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सपोनि देशमुख करीत आहेत.