फळांच्या संरक्षणासाठी साड्यांचे अच्छादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:37+5:302021-04-11T04:21:37+5:30
सध्या शेतात द्राक्षे, डाळिंब, खरबूज, कलिंगड यासह पालेभाज्याही आहेत. या फळांवर वाढत्या तापमानाचा परिणाम होताना दिसतो. शिवाय ढगाळ वातावरण ...
सध्या शेतात द्राक्षे, डाळिंब, खरबूज, कलिंगड यासह पालेभाज्याही आहेत. या फळांवर वाढत्या तापमानाचा परिणाम होताना दिसतो. शिवाय ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे शेतकरी जुन्या साड्यांचा वापर या पिकांवर अंथरून संरक्षण करताना दिसत आहेत.
वाढत्या तापमानामुळे पिकांची मुळे ढिले होतात. पिक करपतात. फळधारणा कमी होते. पाला गळती होते. परिणामी उत्पादनात घट होते. यावर मात करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत.
कोट :::::::::::
वाढत्या तापमानामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढत गेल्यास फळबागा करपून जातात. सध्या फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
- रामचंद्र पतंगे,
शेतकरी, वाघोली
कोट :::::::::
उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत घट होत आहे .चालू वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होत आहे. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबागासाठी विविध उपाययोजना आखाव्यात.
- अजित वसेकर,
कृषी सहायक
फोटो
१०कामती०१
ओळी
वाढत्या तापमानाचा फळावर परिणाम होऊ नये यासाठी साड्या अंथरून संरक्षण करताना शेतकरी.