रांझणीत ५० बेडचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:35+5:302021-05-16T04:20:35+5:30

जि. प. सभापती संजय पाटील यांनी या कोविड सेंटरची संकल्पना राबवली आहे. या कोविड सेंटरसाठी रांझणी गावातील व ...

Covid Center of 50 beds in Ranjani | रांझणीत ५० बेडचे कोविड सेंटर

रांझणीत ५० बेडचे कोविड सेंटर

googlenewsNext

जि. प. सभापती संजय पाटील यांनी या कोविड सेंटरची संकल्पना राबवली आहे. या कोविड सेंटरसाठी रांझणी गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी मदत केली. सर्वांच्या मदतीने ५० बेड उपलब्ध करण्यात आले. कोंडारभागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सोय केल्याचे संजय पाटील भीमानगरकर यांनी सांगितले.

आ. बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून माढा तालुक्यात १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध होतील. सरकारी दवाखान्यात मोफत रेमडेसिविर उपलब्ध होणार आहे. रांझणी येथील कोविड सेंटरला कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन व औषधे दिली जाणार असल्याचे रणजीतसिंह शिंदे यांनी सांगितले.

या वेळी जि. प. सदस्य भारत शिंदे, माजी सदस्या चित्रा वाघ, रमेश पाटील, सरपंच संतोष मेटे-पाटील, उपसरपंच सतीश पाटील, तानाजी गाडे-पाटील, सरपंच पंढरीनाथ चंदनकर, संभाजी पाटील, मयूर काळे, तानाजी सलगर, धर्मराज पाटील, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. नेहा देशमुख, धनंजय तांबिले, श्रीमंत खबाले, सरपंच सोनाली पांडुरंग माने, महादेव जाधव आदी उपस्थित होते.

----

----

फोटाे : १४ रांझणी

५० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन करताना रणजीत शिंदे. या वेळी संजय पाटील, चित्रा वाघ, भारत शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Covid Center of 50 beds in Ranjani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.