कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोविड सेंटर : दत्तात्रय भरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:05+5:302021-05-01T04:21:05+5:30
करकंब (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा क्रमांक २ येथे नव्याने ५० बेडच्या कोविड केअर सेंटरच्या शुभारंभप्रसंगी ते ...
करकंब (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा क्रमांक २ येथे नव्याने ५० बेडच्या कोविड केअर सेंटरच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपसरपंच आदिनाथ देशमुख, सरपंच तेजमाला पांढरे, झेडपी सदस्य रजनी देशमुख, ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख, अभिषेक पुरवत आदी उपस्थित होते.
करकंब कोरोना समिती, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग चांगल्या प्रकारे नियोजन करून काळजी घेत आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारे उपचार करावेत व ते करतील, असा आशावाद पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
एक थेंबही पाणी कुठे जाणार नाही
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार सतत बदलत असतात. त्यामुळे एकदा वाटप झालेले पाणी कोणालाही आणि कोठेही पळवता येत नसते. उजनीच्या पाण्याबाबत राजकीय हेतूने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये खोडसाळपणाने गैरसमज पसरवून सोलापूर आणि इंदापूर, अशी भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. असे सांगून उजनीचे एक थेंबभरही पाणी आम्ही इंदापूरसाठी नेणार नसल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.