गाई वनातल्या; मात्र माणसातल्या नव्या रूपाला पाहून भारावल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:29 PM2020-10-07T14:29:41+5:302020-10-07T14:32:49+5:30
Wildlife Conservation Day वन्य पशू संरक्षण दिन : बार्डीच्या अभयारण्यात वनविभागाकडून केला जातोय वन्य पशूंचा सांभाळ
करकंब : भूक लागलीय मुबलक चारा़़ तहान लागलीय पाणवठे आहेत़़़ कोणाचाही त्रास नाही, अगदी मुक्तपणे नैसर्गिक वातावरणात वावरतात तब्बल ७० वनगाई़ बार्डी (ता़ पंढरपूर) येथील अभयारण्यात वनगाई, हरीण, काळवीट, ससे, कोल्हे, वानर, लांडगे आदी वन्य प्राणी गुण्यागोविंदाने मुक्तपणे वावरतात़ त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला जात असल्याने ते अन्यत्र कोठेही जात नसल्याचे वनरक्षक दिलखुश मुलाणी यांनी सांगितले.
बार्डी हे दुष्काळी गाव़ परंतु या ठिकाणी २६५ एकर क्षेत्रावर घनदाट अभयारण्य आहे़ या अभयारण्यात लांडग्याचा अपवाद वगळता हिंस्र प्राण्यांचा वावर नाही़ या अभयारण्यात एकूण वनगाई ७० आणि २५ पेक्षा जास्त काळवीट अन् हरणांची संख्या आहे.
यंदाच्या हंगामात सततच्या पावसामुळे अभयारण्यात सर्वत्र चाºयाची उपलब्धता आहे़ त्या चाºयावरच वन्य प्राण्यांची गुजराण चालू आहे. परंतु जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा चाºयाची टंचाई निर्माण होते़ त्यावेळी मात्र या प्राण्यांची वणवण भटकंती सुरु होते. परंतु ती रोखण्यासाठी वन विभाग अनेक सामाजिक संस्था, संघटनांना आवाहन करून चारा आणि पाण्याची सोय करते़ याशिवाय वनविभागाकडूनही ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत, असे दिलखुश मुलाणी यांनी सांगितले.
तरीही शेतकºयांचे सहकार्य..
बार्डीच्या अभयारण्यातील वनगाईकडून परिसरातील शेतकºयांच्या शेतीतील पिकांचे नुकसान केले जाते़ शिवाय लांडगे हे शेळ्यांना भक्ष्य बनवितात़ सतत घडणाºया या अशा घटनांमुळे आमचे नुकसान होत असले तरी आमचे सहकार्यच असते, असे शेतकºयांनी सांगितले़ तरीही वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण अभयारण्याला संरक्षक तारेचे कुंपण तयार करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे़