फटाके फुटले... दिवाळीचा माहोल; लाडू वाटले अन् शोभायात्रेने सोलापूर झाले भगवेमय

By Appasaheb.patil | Published: January 22, 2024 03:39 PM2024-01-22T15:39:43+5:302024-01-22T15:39:55+5:30

शहरातील सर्वच मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते

Crackers burst... Diwali atmosphere; Solapur became full of saffron with the procession | फटाके फुटले... दिवाळीचा माहोल; लाडू वाटले अन् शोभायात्रेने सोलापूर झाले भगवेमय

फटाके फुटले... दिवाळीचा माहोल; लाडू वाटले अन् शोभायात्रेने सोलापूर झाले भगवेमय

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: अयोध्येमधील मंदिरात श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अन् सोलापुरात जणू दिवाळी साजरी झाल्याचा माहोल तयार झाला. ठिकठिकाणी शोभायात्रा काढून शहर भगवेमय केले. एवढेच नव्हे तर कुठे पेढे, कुठे लाडू तर कुठे महाप्रसाद वाटपाने श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापनेचा आनंद साजरा केला. शहरातील सर्वच मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. 

श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी आसरा चौकात माजी आ. दिलीप माने यांच्या हस्ते १ लाख लाडू प्रसाद वाटप करण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावातील शोभायात्रेत 'जय श्रीराम, प्रभू रामचंद्र की जय ' बजरंग बली की जय' अशा जय घोषानं परिसर दणाणून गेला. शहरातील अनेक विवाह सोहळ्यात जय श्रीरामचा जयघोष केला. याशिवाय वधू वरांनी प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून लग्नाच्या बोहल्यावर चढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथील श्रीमंत होळकर वाडा येथे श्रीराम मंदिरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची महाआरती करण्यात आली. याशिवाय शहरातील विविध राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

Web Title: Crackers burst... Diwali atmosphere; Solapur became full of saffron with the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.