गुदमरलेले चौक; पाच रस्ते, दोन शाळा अन् रिक्षांचा कन्ना चौकाला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:28 PM2019-02-07T14:28:56+5:302019-02-07T14:31:06+5:30
संताजी शिंदे सोलापूर : शहरातील प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया कन्ना चौकात रिक्षांचा विळखा, फूटपाथवर झालेले अतिक्रमण यामुळे वाहनचालकांना ...
संताजी शिंदे
सोलापूर : शहरातील प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया कन्ना चौकात रिक्षांचा विळखा, फूटपाथवर झालेले अतिक्रमण यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. चौकाला जोडणारे पाच रस्ते शेजारी असलेल्या दोन शाळा आणि विडी कामगारांच्या धावपळीमुळे नेहमी गजबजलेल्या परिसरात कायम वाहतुकीची कोंडी असते.
कन्ना चौकात टिळक चौक, कोंतम चौक, उद्योग बँक, जोडबसवण्णा चौक, राजेंद्र चौक, रविवार पेठ, भवानी पेठ या भागातून येणाºया जाणाºया वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागातून प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाही मोठ्या प्रमाणात येतात. चौकातील पाच रस्त्याच्या पाच कॉर्नरवर रिक्षा चालकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. भर रस्त्यावर थांबलेल्या या रिक्षांमुळे अन्य वाहनांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. रिक्षामध्ये प्रवासी भरण्यासाठी चालक रस्त्याच्या मध्ये थांबून पायी चालणाºया प्रवाशांना अडवत असतात. रिक्षा भरल्याशिवाय हलायचे नाही अशी जिद्द करीत ही मंडळी चौकात थांबलेली असतात.
पूर्व भागातून येणाºया विडी महिला कामगार रिक्षाने कन्ना चौकात येतात, तेथे उतरून पुन्हा दुसरी रिक्षा पकडून कोंतम चौकाच्या दिशेने जातात. प्रत्येक रिक्षात महिलांची गर्दी असते, त्यामुळे विडी महिला कामगारांचा वावर या चौकात जास्त असतो. याच चौकात शेजारी बुर्ला महिला महाविद्यालय व प्रशाला आहे.
सकाळी ७ वाजता भरणारी शाळा, दुपारी ११.३0 वाजता भरणारी शाळा आणि सायंकाळी ५.३0 वाजता सुटणारी शाळी यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या चौकातून ये-जा करतात. दरम्यान, चौकात मोठी वाहतुकीची कोंडी होते. विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून चौक पार करावा लागतो. चौकात सर्व ठिकाणी व्यापाºयांची दुकाने आहेत, हॉटेल्स आहेत, त्यासमोर लागणारी पार्किंग आणि तिथेच विक्रीसाठी उभारलेले फळ विक्रेते, पाणीपुरी विक्रेते हे थांबल्यामुळे चौक दिवसा लहान होतो. मंगळवारी मंगळवार बाजार आणि बुधवारी बुधवार बाजार असतो तेव्हा कन्ना चौकात प्रचंड गर्दी असते.
एक वाहतूक पोलीस नियमित नेमावा...
- चौकात सकाळी ९ पासून रात्री १0 वाजेपर्यंत कायम वाहतुकीची कोंडी होत असते, या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी नसतो. आठवड्यातून एकदा किंवा १५ दिवसातून एकदा वाहतूक पोलीस चौकात दिसतो. त्यामुळे या चौकात बेशिस्त वाहन चालकांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी मोटरसायकल, तीन चाकी रिक्षा आणि चार चाकी गाड्या कशाही येतात आणि जातात. आम्हा व्यापाºयांना या गोष्टीचा खूप त्रास होतो. दोन वाहनांमध्ये थोडा जरी धक्का बसला तर भर चौकात चालकांमध्ये वाद रंगत असतो. यामध्ये चौक आणखीन गुदमरून जातो. वाहतूक शाखेने या गोष्टीकडे लक्ष देऊन दररोज एक पोलीस चौकात नेमला पाहिजे अशी अपेक्षा स्थानिक व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
बेशिस्त वाहतूक...
- चौकाला जोडणाºया पाच रस्त्यावरून कोणते वाहन कोणत्या रस्त्यावरून येईल हे लवकर समजत नाही. येणारे वाहन वेगात येते, अचानक पुतळ्याला वळसा घालून आपल्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असते. या प्रयत्नात आता अपघात होतो की काय अशी भीती वारंवार निर्माण होत असते. प्रवासी भरण्यासाठी आणि सोडण्यासाठी रिक्षा चालक हे जणू स्पर्धा करीत असतात. दररोज हजारो वाहने चौकातील पुतळ्याला प्रदक्षिणा घालतात.