कोरोनाच्या काळात वाढदिवस करण्याची क्रेझ बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:51+5:302021-06-03T04:16:51+5:30

सोमवारी झालेल्या वाढदिवसानिमित्त सरपंच दादासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण केले. कोरोनावर उपचार घेणाऱ्या गणेश सुतार यांना ...

The craze for birthdays changed during the Corona era | कोरोनाच्या काळात वाढदिवस करण्याची क्रेझ बदलली

कोरोनाच्या काळात वाढदिवस करण्याची क्रेझ बदलली

Next

सोमवारी झालेल्या वाढदिवसानिमित्त सरपंच दादासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण केले. कोरोनावर उपचार घेणाऱ्या गणेश सुतार यांना वैद्यकीय खर्चासाठी म्हणून पाच हजार रुपयांची रोख मदत दिली. तसेच ग्रामपंचायत सदस्य, युवा कार्यकर्ते देविदास बरडे व नानासाहेब शिंदे यांनी मिळून रावगाव एकल महिला वसंता सुतार यांना एक महिना पुरेल एवढ्या किराणा मालाचे किट देण्यात आले.

बुधवारी रावगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर पवार यांनीही आपला वाढदिवस साजरा न करता राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयास साडेतीन हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच भेट दिला. अशा पध्दतीने या गावातील अनेकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त असे सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाच्या निमित्ताने असे समाजोपयोगी कार्य केल्यास सामाजिक कार्यास मोठा हातभार लागेल, अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.

---फोटो...

Web Title: The craze for birthdays changed during the Corona era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.