ताट, वाटीचा आवाज आंदोलनासाठी नव्हे;बहिरेपणा तपासण्यास दांपत्याने लावला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:51 PM2019-09-24T12:51:07+5:302019-09-24T12:56:40+5:30
कर्णबधिर जागरूकता दिन : अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाते चाचणी
रुपेश हेळवे
सोलापूर : आतापर्यंत आपण विविध प्रकारची आंदोलने पाहिली असतील़ यामध्ये ताट, वाटी वाजवून आंदोलन करत असतानाही आपण पाहिले असेल; पण हेच ‘ताट-वाटी’ वाजवून मुलांची कर्णबधिरता तपासण्याचा शोध सोलापुरातील भांगे दापत्यांनी लावला आहे. एवढेच नाही तर त्यांच्या या तंत्राचा वापर करून सोलापूरसह पुणे, सातारा, गडचिरोली भागात मुलांची कर्णबधिरता तपासण्यासाठी केला जात आह़े़ यामुळे ताट, वाटीचा उपक्रम आता राज्यभर गाजू लागला आहे.
कर्णबधिरता म्हणजे ऐकू न येणे़ एक हजारातील दोन-तीन मुलांना जन्मजात बहिरेपणा असतो़ जन्मजात बालकांना ऐकू न आल्यामुळे ते बोलू शकत नाहीत़ यामुळे ते मुके बनतात़ जर लहान वयातच मुलगा बोलू शकत नाही याची माहिती मिळाली तर आणि त्या मुलावर योग्य उपचार केल्यास तो बोलू शकतो़ यासाठी आपला मुलगा मुका आहे का नाही हे तपासण्यासाठी जयप्रदा आणि योगेशकुमार भांगे यांनी स्वत: संशोधन करून ताट,वाटी हे तंत्र विकसित केले आहे़ आता हे उपक्रम अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वत्र चाचणी केले जात आहे़ यामाध्यमातून ते मुलांचा बहिरेपणा म्हणजेच एक प्रकारचे वंध्यत्व शोधत आहेत.
या चाचणीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षांतील २.८७ लाख मुलांची तपासणी करण्यात आली़ यामधील साधारणत: १५० मुले हे कर्णबधिर असल्याचे निदर्शनास आले़ मुलांची कर्णबधिरता समजण्यासाठी अत्याधुनिक अशा बेरा मशीनचा वापर केला जातो़ मुले हे कर्णबधिर आहेत का याचा शोध आई-वडिलांनी घेतला पाहिजे़ शून्य ते तीन वर्षांत जर याबाबत माहिती मिळून त्या बालकावर लवकरात लवकर निदान झाले तर त्यांची श्रवण क्षमता विकसित करू शकतो़ यामुळे त्या मुलांना बोलता येते़
असा शोध लागला...
- योगेश हे पेशाने शिक्षक़ त्यांना अठरा वर्षांपूर्वी एक मुलगा जन्माला आला़ पण तो कर्णबधिर असल्याचे त्यांना कळाले़ यामुळे त्यांनी पुणे येथे जाऊन त्याच्यावर उपचार करून तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मशीनचा वापर करून आपल्या मुलाला बोलण्याचे शिकवले आणि त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील कर्णबधिर मुलांसाठी शाळा सुरू केली़ याचबरोबर त्यांनी कमी वयात बहिरेपणा शोधणाºया ‘ताट वाटी’ चाचणीचा शोध लावला़ या चाचणीचा आता सातारा, पुणे, गडचिरोली या भागात वापर केला जात आहे़ याचबरोबर त्यांनी ‘होय कर्णबधिर बालके बोलू शकतात’ हे पुस्तक लिहिले़ त्यांच्या या कार्यामुळेच आता त्यांच्या या पुस्तकाचे नाव शासकीय योजनेला देण्यात आले़ यासाठी मागील अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली आहे़
टाळी वाजवली की मूल आपल्याकडे पाहते हे आईने पहिल्या ६ महिन्यात तपासले पाहिजे़ जर मुलाला ऐकू येत असेल तर त्याला बोलताही लवकर येते़ जर काही नॉर्मल रिअॅक्शन मुलामध्ये नसतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा़ जर लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आपले मूल नॉर्मल होऊ शकते़ मुलींमध्ये व्यसनाचे परिणाम वाढू लागल्यामुळे याचा परिणाम गर्भातील मुलांवर होऊ शकतो़
-शैलेश बच्चुवार,
कानाच्या मशीनचे तज्ज्ञ