सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा केला म्हणून संग्रामनगरच्या सरपंचासह १४ जणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:21+5:302021-07-10T04:16:21+5:30

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास अकलूज शहर हद्दीत हवालदार भोसले, शेख, महिला पोलीस निरीक्षक ...

Crime against 14 persons including Sarpanch of Sangramnagar for celebrating birthday on public road | सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा केला म्हणून संग्रामनगरच्या सरपंचासह १४ जणावर गुन्हा

सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा केला म्हणून संग्रामनगरच्या सरपंचासह १४ जणावर गुन्हा

googlenewsNext

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास अकलूज शहर हद्दीत हवालदार भोसले, शेख, महिला पोलीस निरीक्षक तांबोळी हे पॅट्रोलिंग करीत होते. यावेळी जुने बसस्थानकानजीक हाॅटेल अमीर समोर गेले असताना संग्रामनगर ग्रामपंचायतीचे सरपंच कमालभाई शेख, रशिदभाई मुलाणी, जमीरभाई चौधरी, रियाजभाई शेख, भैया माढेकर, नजीम खान, सोमनाथ पवार, महेंद्र साठे, सुधाकर बनसोडे, हसन माढेकर, तन्वीर पठाण, हमीद मुलाणी हे सार्वजनिक रोडवर बेकायदेशीर लोकांची गर्दी थांबले असल्याचे दिसले. शिवाय विनामास्क एकत्रित येऊन रफिकभाई पठाण व यासीन बागवान यांचा वाढदिवस साजरा करत होते. मानवी जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली कृती केली म्हणून सर्वावर भा.दं.वि. २६९, १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब प्रमाणे पोलीस अमोल पवार यांनी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात चौदा जणांवर गुन्हा नोंदला आहे.

-----

नागरिकाकडून कोणतीही तक्रार आल्यास तात्काळ दखल घेऊन कारवाई करत आहोत. अकलूजमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या अनेक प्रतिष्ठितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

- अरुण सुगावकर, पोलीस निरीक्षक

Web Title: Crime against 14 persons including Sarpanch of Sangramnagar for celebrating birthday on public road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.