चारही पदव्या बनावट असलेल्या महिला डाॅक्टरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:29 AM2021-09-10T04:29:11+5:302021-09-10T04:29:11+5:30
या महिला डाॅक्टर शासनमान्य नसलेल्या पदवीच्या आधारे बाणेगाव येथे अवैधरीत्या दवाखाना चालवीत असल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे आली होती. ...
या महिला डाॅक्टर शासनमान्य नसलेल्या पदवीच्या आधारे बाणेगाव येथे अवैधरीत्या दवाखाना चालवीत असल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे आली होती. तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बोगस डाॅक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा बीडीओ डाॅ. प्रशांत देशमुख, सदस्य सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी मोहन शेगर, समितीचे सदस्य तथा विस्तार अधिकारी अमोल तोडकर, सरपंच लिंबाजी जाधव, पोलीस पाटील मधुकर पाटील, आरोग्य सहायक धत्तरगी यांनी बुधवारी बाणेगाव येथील मिता मंडळ यांच्या बाणेगाव-कारंबा रोडलगत पत्रा शेडमध्ये सुरू असलेल्या दवाखान्याची तपासणी केली.
यात संशय आल्याने मिता मंडळ (वय- २७, रा. सावरगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांच्याकडे नोंदणी अथवा शैक्षणिक पात्रता दोन्ही बाबी
नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६ कलम १५ (२) व महाराष्ट्र मेडिकल प्राक्टीसनर ॲक्ट १९६१ चे कलम ३३(२), भादंवि कलम ४१९, ४२० नुसार सोलापूर तालुका पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.
----
चारही प्रमाणपत्रे संशयित
संबंधित डॉक्टराकडे चौकशी केली असता चार प्रमाणपत्रे आढळली. ती संशयित आढळली. इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६ किंवा महाराष्ट्र मेडिकल प्राक्टिस १९६१ नुसार नोंदणी प्रमाणावर आढळले नाही. तेथील ॲलोपॅथिक औषधे, इंजेक्शन व प्रमाणपत्र जप्त करण्यात आली. मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवीशिवाय व्यवसाय करून पेशंटची फसवणूक करीत असल्याचे समोर आले.
------