मजुराच्या आत्महत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:22 AM2021-05-10T04:22:01+5:302021-05-10T04:22:01+5:30

बार्शी : बाजार समितीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करुन विटंबना केल्याप्रकरणी ...

Crime against a person who went viral by making a video of a worker's suicide | मजुराच्या आत्महत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हा

मजुराच्या आत्महत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हा

googlenewsNext

बार्शी : बाजार समितीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करुन विटंबना केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांनी अहमद शेख याच्या विरूध्द गन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी ज्योतीराम मारुती बनसोडे ( ३६, रा. मांगडे चाळ, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांकडील माहितीनुसार शुक्रवारी रात्री एका मुजराने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पोलिसांना याची माहिती मिळाली. संबंधिताचा मृतदेह रस्त्याच्या कडेला लटकत असल्याने बघ्यांची गर्दी झाली. पोलीस कर्मचारी माने हे घटनास्थळी दाखल झाले आणि गर्दी पांगवीत होते. दरम्यान, अहमद शेख हा तोंडाला मास्क न लावता व्हिडिओ काढत होता. त्याला पोलिसांनी हटकले. लटकत असलेल्या मृतदेहाचा व्हिडिओ काढत असताना त्याला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याने व्हिडिओ करुन व्हायरल केले.

Web Title: Crime against a person who went viral by making a video of a worker's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.