लाच स्वीकारल्याप्रकरणी रस्तापूच्या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:35+5:302021-03-05T04:22:35+5:30
याबाबत या ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब शहाजी बरबडे (वय- ४२) बार्शी शहर पोलिसात तक्रार देताच पोलिसानी भ्रष्टाचार प्रतिबंध १९८८ चे ...
याबाबत या ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब शहाजी बरबडे (वय- ४२) बार्शी शहर पोलिसात तक्रार देताच पोलिसानी भ्रष्टाचार प्रतिबंध १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
ग्रामविकास निधीनंतर्गत मिळणाऱ्या रकमेतून तक्रादारांना त्याचे स्वखर्चाची रकम मिळण्यासाठी संबंधित वस्तू खरेदी केलेल्या दुकांनदारास त्यांची रक्कम देण्यासाठी चेक काढावे लागतात. त्यासाठी यातील तक्रादारानी चेकवर सह्या केल्या असूनही ग्रामसेवकांनी या चेकवर सही करण्यास ३ टक्के बक्षिसाची लाच मागितली. त्यात तडजोड करून अडीच टक्क्याप्रमाणे २१ हजार २५० रुपये देण्याचे ठरवले. त्यानुसार ती स्वीकारताना त्यास रंगेहाथ पथकांनी पकडले.
या १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीमार्फत दलित वस्तीतील समाज मंदिर, बालवाडीसाठी संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉकची कामे केली आहेत.
याबाबत फिर्यादी सरपंच यांनी सोलापूरच्या पथकास ही माहिती कळविले असता पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस अर्चना स्वामी, उमेश पवार, स्वप्नील सन्नके या पथकांनी येऊन ही रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ पकडले.