महूदमध्ये कापड दुकान चालू ठेवणाऱ्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:26+5:302021-05-21T04:23:26+5:30
सांगोला : महूद ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कापड दुकान विनापरवाना चालू असल्याचे सांगोला पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी जनार्धन दत्तात्रय ...
सांगोला : महूद ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कापड दुकान विनापरवाना चालू असल्याचे सांगोला पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी जनार्धन दत्तात्रय गुरव (रा. फळवणी़, ता. माळशिरस) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
बुधवार, १९ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास कापड दुकान उघडे असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे.
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सकाळी ७ ते ११ वेळेत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर, पोलीस उपनिरीक्षक नाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल झोळ, पोलीस नाईक मोहोळकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, होमगार्ड धायगुडे यांचे पथक गस्त घालत असताना गुरव यांचे कापड दुकान उघडे असल्याचे निदर्शनास आले.