बनावट कागदपत्रांबद्दल तत्कालीन मुख्याध्यापक, लिपिकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:26 AM2021-09-24T04:26:30+5:302021-09-24T04:26:30+5:30
वैराग : येथील विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका आणि वरिष्ठ लिपिकांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे, सही, शिक्के, तयार करून ...
वैराग : येथील विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका आणि वरिष्ठ लिपिकांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे, सही, शिक्के, तयार करून संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याबद्दल संस्थाध्यक्ष भूषण भूमकर यांनी फिर्याद दिली आहे. यावरून फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांनुसार तत्कालीन मुख्याध्यापिका जिन्नत जागीरदार या २००९ ते २०१४ या कालावधीत विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या, तर नंदकुमार रणदिवे हे २००५ ते २०१७ पर्यंत वरिष्ठ लिपिक होते. यादरम्यान जागीरदार यांनी तयार केलेल्या पेन्शन प्रस्तावावर व तारीख असलेले व नसलेल्या दोन कव्हरिंग लेटरवरच्या प्रस्तावावर अध्यक्षांची सही केली आहे, तसेच जागीरदार यांच्या सेवा पुस्तकांमधील रजेचा तपशील बनावट आहे. तेथेही सेक्रेटरीच्या बनावट सह्या केल्या आहेत. अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ होण्याची खोटी कागदपत्रे बनवली असल्याचे फिर्यादीत नमूद केले असून, भूमकर यांनी जहागीरदार व रणदिवे यांच्याविरोधात वैराग पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास फौजदार राजेंद्र राठोड करीत आहेत.