तलवार घेऊन अंगावर गेल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:05+5:302021-07-18T04:17:05+5:30

मोहोळ : एका गुन्ह्यात साक्षीदार झाल्याचा राग मनात धरून केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी बाप-लेक गेले असता, तलवार घेऊन अंगावर ...

Crime against two persons including a woman for carrying a sword | तलवार घेऊन अंगावर गेल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरोधात गुन्हा

तलवार घेऊन अंगावर गेल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरोधात गुन्हा

Next

मोहोळ : एका गुन्ह्यात साक्षीदार झाल्याचा राग मनात धरून केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी बाप-लेक गेले असता, तलवार घेऊन अंगावर गेल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना १७ जुलै रोजी वरकुटे येथे घडली.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार वरकुटे येथील एका महिलेने मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संतोष भीमराव बसाटे हा साक्षीदार होता. याचा रोष मनात धरून १७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता संदीप प्रभाकर बचुटे याने तू माझ्याकडे रागाने का बघतोस, असा जाब विचारत फिर्यादी संतोष बसाटे यास मारहाण केली. खिशातून ४ हजार ७२० रुपये काढून घेतले. या घटनेचा जाब विचारण्यासाठी संतोष बसाटे व मुलगा ओंकार हे दोघे गेले असता, संदीप प्रभाकर बचुटे व त्याची आई हातात तलवार घेऊन बाहेर येऊन तुम्ही नेहमीच आमच्या मुलाविरुद्ध खोड्या काढता, पोलिसांत साक्ष देता, असे म्हणत अंगावर धावून गेले.

अधिक तपास सहायक पोलीस फौजदार लोभो चव्हाण हे करत आहेत.

Web Title: Crime against two persons including a woman for carrying a sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.