८५ लाखांची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:21+5:302021-03-13T04:41:21+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी बाराच्या सुमारास एबीबी कंपनीचे कलकत्ता यांच्यातर्फे काम सुरू असताना गुरसाळे ते ...

Crime filed against social workers demanding Rs 85 lakh | ८५ लाखांची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

८५ लाखांची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी बाराच्या सुमारास एबीबी कंपनीचे कलकत्ता यांच्यातर्फे काम सुरू असताना गुरसाळे ते आढीव गावाच्या शिवारात रामभाऊ गायकवाड यांनी काम करायचे नाही, काम बंद करा, अशी कामगारांना दमदाटी केली होती. याबाबत एनटीपीसीचे महाप्रबंधक अनिलकुमार कोकिलाचंद प्रसाद यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे नंबरप्रमाणे १ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

गुरसाळे व आढीव येथील टॉवर गॅस कटरने कट करून ८ मार्च रोजी रात्री दहा ते ९ मार्च रोजी पहाटे सहाच्या दरम्यान पाडले आहेत. एकूण ७ टॉवर पाडून ५६ लाख रुपयांचे नुकसान केले आहे. हे टॉवर रामभाऊ गायकवाड (रा. गुरसाळे) यांनी त्यांचे सहकारी घेऊन पाडले आहे, अशी खात्रीदायक माहिती एबीबी कंपनीचे साइड मॅनेजर रणजित शहा यांच्याकडे आहे.

रामभाऊ गायकवाड (रा. गुरसाळे) यांनी आमचे कंपनीचे टॉवर काम चालू असताना मागितलेली रक्कम ८५ लाख रुपये दिले नाहीत म्हणून त्याने व त्याच्या सहकारी साथीदारांनी गॅस कटरच्या साहाय्याने कट करून एकूण सात टॉवर पाडून कंपनीचे ५६ लाख रुपयांचे नुकसान केले आहे.

त्याच्या एकूण ६ ते ७ साथीदारांनी प्रत्येक नावाला दोन लाख असे एकूण ८५ लाख रुपये दिले नाहीत. या कारणावरून चिडून जाऊन गॅस कटरचा वापर करून टाॅवर पाडले.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून रामभाऊ गायकवाड याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये एनटीपीसी कंपनीचे उपमहाप्रबंधक के. वस्सी मोहन यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर २३ नोव्हेंबर २०१६ रोजी नगोर्ली (ता. माढा) येथील येवले-पाटील यांच्या शेतात कंपनीचे महेंद्रकुमार शहा काम करत होते. त्यावेळी रामभाऊ गायकवाड व त्याच्या साथीदारांनी काम बंद करा म्हणून कंपनीचे काम चालू असलेल्या मशीनचे नुकसान केले. तसेच महेंद्रकुमार शहा यांना लोखंडी सळईने मारून जखमी केले होते. याप्रकरणी रामभाऊ गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

रामभाऊ गायकवाड यांना पैसे द्या, कामास आडवे येणार नाही, असा २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कंपनीचे वरिष्ठ प्रबंधक जयवर्धनसिंग विजयसिंग शेखावत यांना त्यांच्या मोबाइल (९५२९४६१९४१) नंबरवर फोन आला होता. त्यामध्ये रामभाऊ गायकवाड यांना काहीतरी पैसे द्या, आम्ही कामासाठी येणार नाही, तुमचे तुम्ही काम चालू करा, कोणी आडवे येणार नाही असे म्हणाले होते.

Web Title: Crime filed against social workers demanding Rs 85 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.