सांगोला तालुक्यातील दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:22+5:302021-09-04T04:27:22+5:30
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमणी रा. व्यंकटेशनगर, सोलापूर यांनी जवळा येथील बसवेश्वर शिवलिंगप्पा कलशेट्टी व हलदहीवडी, ता. ...
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमणी रा. व्यंकटेशनगर, सोलापूर यांनी जवळा येथील बसवेश्वर शिवलिंगप्पा कलशेट्टी व हलदहीवडी, ता. सांगोला येथील सुब्रत गोपालदास या दोन बोगस डॉक्टरांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला.
जवळा येथील बसवेश्वर शिवलिंगप्पा कलशेट्टी या बोगस डॉक्टरवर कारवाई करावी, असा लेखी अर्ज गफार इनामदार यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे दिला होता, तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सदरच्या बोगस डॉक्टराविषयी तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे लेखी पत्र दिले होते. हलदहीवडी येथे १० वर्षांपूर्वी सुब्रत गोपाल दास याने ग्रामपंचायतसमोरील अण्णासाहेब पवार यांच्या जागेमधील गाळ्यात दवाखाना सुरू केला होता. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६ किंवा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ प्रमाणे संबंधितांकडे नोंदणी करणे व त्यासोबत शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक होते; परंतु या दोन्हीबाबतचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसताना हलदहीवडी गावात विनापरवाना बेकायदेशीरपणे पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करीत होता. रुग्णाच्या जीवितास व आरोग्याचा याची जाणीव असताना त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करीत होते.
.......
गोळ्या-औषधे जप्त
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा दोडमणी, मिलिंद सावंत, कुष्ठरोग तज्ज्ञ रमेश अंधारे यांनी दोन्ही ठिकाणी अचानक छापे टाकून ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमणी यांनी औषधी, इंजेक्शन, गोळ्या जप्त केल्या आहेत.